An important decision of the Kinwat Court : कतलीसाठी जाणारे जनावरे गोशाळेतच राहणार; किनवट न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील बोधडी (बु.) येथे जुलै २०२४ मध्ये तीन वहानातून ११ गोवंश , ५ म्हशी व हडी आणि गोमांस नेत असल्याची गुप्त माहिती किनवट पोलिसाना मिळाल्या वरून पोलिसानी सापळा रचून ती वहाने पकडून पशु सह जप्त केले होते. ते परत मिळावे म्हणून शेख ईद्रीस यांनी किनवट कोर्टात अर्ज केला होता. पशु कतलीसाठीच नेत असल्याचे कोर्टात सिद्ध झाल्याने कोर्टाने अर्ज रदद करत गोवंश गोशाळेतच राहातील असा निर्णय दिला आहे .
माहे जूलै २०२४ मध्ये बोलेरो पिकप मध्ये ११ गोवंश, दुसऱ्या बोलेरो पिकप मध्ये ५ म्हशी आणि तिसऱ्या एका वाहनात हड्डी आणि गोमांस नेत असताना किनवट पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्या वरून पोलिसानी सापळा रचून बोधडी (बु.) येथे ही वहाने पकडून कारवाई केली होती. वाहानातील ११ गोवंश कृष्णप्रिय गोशाळा किनवट येथे ठेवले व ५ म्हशी देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना ता. हिमायातनगर येथे ठेवले होते...
