नांदेड l 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान वाराणसी, उत्तरप्रदेश येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत अनिकेत नागरगोजे व आरुषी कदम यानी मिश्र दुहेरी स्पर्धेत आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत सिल्वर पदक प्राप्त केले तर आराध्या जगताप हिने ब्रॉन्झ पदक प्राप्त करून नांदेड जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे.


सध्या नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेले अनिकेत, आरुषी व आराध्या हे तिघे गत दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच शिवछत्रपती अवार्ड प्राप्त कोचं अमोल बोरीवाले यांच्याकडे आर्चरीचे धडे घेत आहेत .


दोन वर्षाच्या काळातच त्यानी राष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारली. महाराष्ट्र विरुद्ध केंद्रीय विद्यालय यांच्यातील अंतिम सामन्यातील चूरशीच्या लढतीत सिल्वर पदक प्राप्त केले.त्यांच्या या यशाबद्दल कोचं अमोल बोरिवाले, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक दीपककुमार, सह मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे. अनिकेत हा पत्रकार ज्ञानोबा नागरगोजे यांचा मुलगा आहे. आर्चरी स्पर्धेत देशासाठी खेळायचे आहे. आपले पुढील लक्ष ऑलिम्पिक असून त्या दृष्टीकोनातून वाटचाल असणार आहे- अनिकेत नागरगोजे, राष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू.


आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी खेळायचे आहे. खेळातील सातत्य हेच आपल्याला यशाकडे घेऊन जाते- आरुषी कदम, राष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू खेलो इंडिया, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून देशाचे नाव लौकिक करायचे आहे -आराध्या जगताप- राष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू



