लोहा| ऐंशीच्या दशकात ज्या गल्लीतून जाताना लोक नाकाला रुमाल लावायचे त्याच गल्लीत आज शिक्षणाच्या बळावर ज्ञानाचा सुंगध राज्यात दरवळतो आहे. शहराच्या संत रविदास नगरातील वर्षा बालाजी फुलपगार या विद्यार्थ्यांनीचा एमबीबीएस धाराशिव येथे प्रवेश निश्चित झाला असून समाजात मुलीतून पहिली डॉक्टर होण्याचा मान तिला मिळणार आहे
शहरातील संत रविदास नगरात राहणारे बालाजी फुलपगार यांनी अत्यंत गरिबीतून शिक्षण घेतले.ते उपक्रमशील शिक्षक आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हे साध्य झाले अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्याची मुलगी वर्षा हिचे शिक्षण कै विश्वनाथराव नळगे विद्यालयात झाले दहावी बोर्ड परीक्षेचे ९९.८०टक्के गुण मिळाले ते लोह्याच्या राजर्षी शाहू ज्यू .कॉलेज मध्ये बारावी झाली तिने८६.६७टक्के गुण संपादन केले .
नीट परीक्षेचे ५६१ गुण मिळविले असून पहिल्याच यादीत तिला धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला आहे आययबी क्लासेसची विद्यार्थीनी आहे .वडील बालाजी फुलपगार आई मीना यासह त्याचा नातेवाईक तसेच समाजासाठी वर्षा हिने मिळविलेले यश अभिमानास्पद आहे यापूर्वी राम खरात याचा मुलगा एमबीबीएस झाला त्यानंतर समाजातून पहिली डॉक्टर मुलगी होण्याचा मान वर्षा फुलपगार हिस मिळाला आहे तिच्या यशा बद्दलसर्वत्र अभिनंदन होत आहे.