नांदेड। छकुला… छकुला .. छकुला… असा बँग राऊंड आवाज …. खोडकर मुलगा ….गिधाड गँग ..अतिशय मजेदार तितकाच खेळून ठेवणारा “माझा छकुला “हा १९९३ मध्ये आला आणि महेश कोठारे .लक्ष्मीकांत बेर्डे यां जोडीचा हा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला.त्यातील “छोटा छकुला’म्हणजे आदिनाथ कोठारे यांनी लोहा तालुक्यातील नागदरवाडी या गावात ‘पाणी’हा चित्रपट बनविला आहे.बाबुराव केंद्रे या भूमिपुत्रांच्या जीवनावर आधारित कथानक असलेला “,पाणी’आज १८ ऑक्टोबर रोजी राज्यभर प्रदर्शित होत आहे.
नागदरवाडी “पाण्याची भीषण टंचाई ते पाणीच पाणी ” झालेले गाव देशभरात पोहचले मराठी चित्रपट सृष्टीतील महेश कोठारे हे मोठे नाव.चार पाच वर्षा पूर्वी त्याचा” छोटा छकुला’आदिनाथ कोठारे हे लोहा तालुक्यातील नागदरवाडी गावात आले होते. त्यांनी “पाणी ” नावाची डाक्युमेंट्री बनवली होती त्यास”राज्य क देशपातळीवर पारितोषिक मिळाले होते.
लोहा तालुक्यातील माळाकोळी -माळेगाव हा भाग खडकाळ मुरमाड आहे.वाडी तांड्याची संख्या अधिकची आहे तसेच पाण्याची भीषण टंचाई असलेला भाग होय.माळाकोळी गावाच्या जवळ असलेली नागदरवाडी हे गाव त्या गावातील हणमंत केंद्रे त्यांना बाबुराव असे ही म्हणतात. मुखेड तालुक्यातील येवती येथील बापूराव संभाजी नागरगोजे याची कन्या सुवर्णा नागरगोजे केंद्रे याच्या सोबत लग्नजुळले .पण मुलीच्या वडिलांनी गावात म्हणजे वाडीत पाणी नाही .पाण्यासाठी पायपीट करावी लागते..कोसोदूर जावं लागत .माझ्या लेकीला होणार नाही म्हणून लग्नास नकार दर्शविला.पण गावात पाणी आल्यावर मुलगी देणार ना . असा शब्द बाबुराव केंद्रे (हणमंत) यांनी होणाऱ्या सासाऱ्यांकडून घेतला.
१९९८ते २००४ या काळात नागदरवाडी या खडकाळ भागात त्यांनी पाणी आडवा -पाणी जिरवा मोहिम राबविली.स्वतः श्रमदान केले.गावकऱ्यांना पाण्याचं महत्व त्यांनी पटवून सांगितले .टाटा इन्स्टिट्यूट मधील डॉ व्यंकटेश तगद, त्याचे बंधू बालाजी केंद्रे, प्रमोद देशमुख (सगरोळी )याची मोठी मदत झाली.इंडो जर्मन पानलोट क्षेत्र विकास हा कार्यक्रम या गावात राबविला.ग्रामस्थांची साथ मिळाली अन गावात पाणीच पाणी झाले. बाबुराव याची अजोड मेहनत व जिद्द पाहून त्यांना बापूराव यांनी मुलगी दिली. आणि लग्न झाले पाण्यामुळे लग्न मोडण्याची वेळ आली तर गावात कोणाचेच लग्न होणार नाही हे शल्य मनात ठेवून गाव पाणीदार करणाऱ्या “पाणीवाला छोकर
बाबुराव”” याना अनेक पुरस्कार मिळाले. ते “पाणीदार “मोहिमेचे आयकॉन झाले.आणि मराठी चित्रपट सृष्टीतील आजच्या घडीचे प्रसिद्ध अभिनेते आदिनाथ कोठारे यांनी बाबुराव याच्या जीवनावर चित्रपट तयार केला.
कुरूळा नागलगाव येथे प्राचार्य संजय पवार यांनी आदिनाथ कोठारे व संपूर्ण कलावंत बॅक स्टेज कलावंत याची व्यवस्था केली.कुरूळा, लोहा कंधार, शेकापूर, रामाचीवाडी, रामानाईक तांडा, हरसद पाटी,माळाकोळी, नागदरवाडी, माळेगाव शेलगाव या भागात ४०-५०दिवस या चित्रपटाची शुटिंग झाली. आज १८ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वच सिनेमा गृहात पीव्हीआर मध्ये “पाणी ” हा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे यात छोटा छकुला “आदिनाथ कोठारे, ऋचा वैद्य, सुबोध भावे, नितीन दीक्षित, किशोर कदम, माधुरी नांदेडकर, लोह्याचा सुनील हटकर रवी जाधव या कलाकारांच्या भूमिका असून स्वतः आदिनाथ कोठारे यांनी बाबुराव याची भूमिका साकारली आहे.खेड्यातील एखाद्या सर्वसामान्य पण गावासाठी पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भूमिपुत्रावर चित्रपट बनतो हे निश्चितच अभिमानाची गौरवाची बाब होय.
२०१८ मध्ये लोहा कंधार च्या माळरानात “माझा छकुला” असे संबोधन झाले .अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी लोह्याच्या मुन्ना होंराव याच्या दही धपाट्याचा स्वाद घेतला. त्यांनी बाबुराव याच्या कार्याची दखल घेतली होती १८ऑक्टोबर रोजी “पाणी” प्रदर्शित होत आहे.