हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी सक्षम, प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार अब्दुल अखिल भाई हे भावी नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पुढे येऊ लागले आहेत.


हिमायतनगर ही केवळ एक नगरी नसून, ती आपल्या भावना, संघर्ष आणि स्वप्नांचे प्रतीक असल्याचे सांगत अखिल भाई यांनी शहराच्या विकासाचा व्यापक आराखडा मांडला आहे. त्यांच्या संकल्पनांनुसार शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण आणि सुरक्षित वस्तींची निर्मिती, प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पुरवठा, शिक्षण, रोजगार आणि प्रगतीसाठी समान संधी, स्वच्छ, हरित आणि आधुनिक हिमायतनगराची उभारणी हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.


अखिल भाई म्हणतात, “विकास म्हणजे फक्त इमारती आणि जमीन नव्हे, तर समाधानी नागरिक आणि त्यांच्या विश्वासाचे प्रतिक असलेले शहर” त्यांच्या नेतृत्वात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. अनेक तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थन दर्शवत सोशल मीडियावर, प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून हिमायतनगरच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने “अखिल भाई ला साथ द्या – विकासाला बळ द्या!” असा नारा सध्या शहरभर उमटू लागला आहे.



