नांदेड। परम श्रद्धेय स्वामी रामदेव जी महाराज यांच्या भगीरथ प्रयत्नाने योग घरोघरी पोहोचत आहे. 2015 पासून योग्य विद्या विश्वभर मान्यता प्राप्त झाली आहे. 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरी होत आहे. 2024 हा दहावा योग दिवस असून, महाराष्ट्र पूर्वच्या योग शिक्षकांच्या माध्यमातून 18 19 व 20 जून दरम्यान जवळपास प्रत्येक विद्यालय, महाविद्यालय, वस्तीगृह आदी ठिकाणी एक दिवसीय निशुल्क योग शिबिर घेण्यात येत आहे.
आज रोजी अनिल अमृतवार, सहराज्य प्रभारी, भारत स्वाभिमान व शिवाजीराव शिंदे, भारत स्वाभिमान, जिल्हा सहप्रभारी यांच्या माध्यमातून लोहा येथे नळगे शाळेत एक दिवसीय योग वर्ग घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक विलास नागेश्वर, योगशिक्षक वैजनाथ खेडकर व शाळेच्या सर्व शिक्षकांनी शिबिर संपन्न होण्यासाठी मदत केले. याप्रसंगी शाळेचे 1200 विद्यार्थी उपस्थित होते.