छत्रपती संभाजीनगर/नांदेड| प्राध्यापकांना निवडणूक प्रचार प्रतिबंध निर्णयाच्या विरोधात “नॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशनचे” संथापाक अध्यक्ष प्रा.डॉ.राजपालसिंह चिखलीकर व कार्याध्यक्ष प्रा. डॉ.शिवराज मंगनाळे यांनी बॉम्बे उच्चं न्यायालयाचे औरंगाबाद खंडापीठात दि.11 नोव्हेंबर रोजी 2024 रोजी याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये मा. निवडणूक आयोग यांचेकडून आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबत महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचनालय, पुणे यांनी दिनांक 05 /11/ 2024 रोजी परिपत्रक काढले आहे. ज्यामधे शिक्षण संचालक यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठ व सलग्नित महाविद्यालयातील व कर्मचारी यांचा सामायिक परिनियम अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरीक सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 5(1) मध्ये नमूद केल्यानुसार, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही सदस्य होता येणार नाही किंवा सहाय्य करता येत नाही.
तसेच 5(4) नुसार विधानसभेचे किंवा स्थानिक प्राधिकरण निवडणूक प्रचार करू शकणार नाही किंवा हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व सलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी राजकीय पक्षात निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास, विद्यापीठ व संबंधित संस्थांनी शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशाच्या विरोधात “नॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशनचे” संथापाक अध्यक्ष प्रा.डॉ.राजपालसिंह चिखलीकर व कार्याध्यक्ष प्रा. डॉ.शिवराज मंगनाळे यांनी बॉम्बे उच्चं न्यायालयाचे औरंगाबाद खंडापीठात दि.11/11/2024 रोजी याचिका क्र.30920 द्वारे आव्हान दिले आहे. शासनाला सुद्धा नोटीस बाजावली आहे. प्राध्यापकांची बाजू अधीवक्ता ऍड.राहुल अवसरमोल मांडत आहेत.