हदगाव, शेख चांदपाशा। मौजे वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके हे अंतरवालीच्या वेशीवर असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव साठी आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.
ओबीसी कार्यकर्त्यांनी हाके यांना भेटण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती राज्य सरकार जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण न देण्याबाबत लेखी देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा निर्धार प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे सोमवारी हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातून चारशेहून अधिक गाड्या वडीगोद्री येथे दाखल झाल्या होत्या यामध्ये शिरूर तालुक्यातून तब्बल दोनशेहून अधिक गाड्या आल्या होत्या याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून व तालुक्यातून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव वडीगोद्री येथे दाखल झाले होते.
याच बरोबर हाकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हदगाव तालुक्यातील असंख्य ओबीसी चे शिष्ट मंडळ वडीगोद्री दाखल झाले होते यात ओबीसीचे नेते ज्ञानेश्वर गुध्दटवार ( नाना ) ,पत्रकार गजानन जिदेवार आष्टीकर , विठ्ठलराव मस्के पळसेकर, बाळू ढोरे पाथरडकर , बालाजी खर्डे चिंचगव्हाणकर, त्रिंबक पाटील वाकोडे , इत्यादी ओबीसी शिष्टमंडळाने प्रा.लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन आम्ही हदगाव तालुक्यातील समस्त ओबीसी बांधव आपल्या उपोषणाला पाठिंबा देत असल्याचे सांगितले आहे.