हदगाव तालुक्यातील ओबीसीचे शिष्टमंडळ वडगोद्री येथे उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या भेटीला -NNL
हदगाव, शेख चांदपाशा। मौजे वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके हे अंतरवालीच्या वेशीवर असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव साठी आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.
ओबीसी कार्यकर्त्यांनी हाके यांना भेटण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती राज्य सरकार जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण न देण्याबाबत लेखी देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा निर्धार प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे सोमवारी हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातून चारशेहून अधिक गाड्या वडीगोद्री येथे दाखल झाल्या होत्या यामध्ये शिरूर तालुक्यातून तब्बल दोनशेहून अधिक गाड्या आल्या होत्या याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून व तालुक्यातून आंदोलनाला पाठिंब...
