Wednesday, May 13

Celebrating Punishment Week Day | सहस्त्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षा सप्ताह दिन साजरा – NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययनाच्या शाळा – पूर्व स्तरापासून उंच शिक्षण स्तरापर्यंत प्रत्येक स्तरावर विशिष्ट निर्धारित कौशल्य आणि मूल्यांची ओळख करून देणे गरजेचे आहे यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे अमलात आणले असता भारत सरकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार किनवट तालुक्यातील सहस्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल इंग्लिश स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त “शिक्षा सप्ताह” दिन 22 जुलै ते 28 जुलै या दरम्यान घेण्यात आला आहे.

या सप्ताहात शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली गेली विद्यार्थ्यांच्या गणितीय व भाषा कौशल्यवृद्धीसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले विविध खेळ स्पर्धा आयोजित केल्या गेल्या स्किलिंग डे अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी के पी गायकवाड यांनी आपत्कालीन परिस्थितीत धैर्य ठेवून प्रथम उपचार कसा करावा याचे प्रात्यक्षिक सादर केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याच बरोबर इको क्लब ची स्थापना करून प्लांट फोर मदर इनिशटिव्ह द्वारे विद्यार्थ्यांनी व त्यांच्या आई-वडिलाकडून वृक्षारोपण करण्यात आले.

IMG 20240801 WA0023 Celebrating Punishment Week Day | सहस्त्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षा सप्ताह दिन साजरा - NNL

तसेच शाळेच्या प्रगतीसाठी समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना शाळेत बोलावून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले या शिक्षा सप्ताह दिनानिमित्त शाळेत सलग सात दिवस टी एल एम डे, एफ एल एन डे, स्पोर्टस डे, कल्चर डे, स्किलिंग अँड डिजिटल इनिशटिव्ह डे, इको क्लबस फॉर मशीन लाईफ कम्युनिटी इनवरमेन्ट डे, इत्यादी उपक्रम घेण्यात आले. हे उपक्रम राज्यातील आदिवासी विभागाच्या आयुक्त श्रीमती नयना गुंडे मॅडम व अमरावती आदिवासी विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे तसेच किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम घेण्यात आल्याची माहिती एकलव्य रेसिडेन्शियल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य राधिका गोलटकर यांनी ही माहिती दिली आहे.

भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षा सप्ताह दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले असता या उपक्रमा दरम्यान प्रभारी जाधव मॅडम सी सी ए, प्रभारी वाघमारे मॅडम संगीत शिक्षक ज्ञानेश्वर डांगे सर विद्यालय शिक्षक वृंद अधीक्षक अधीक्षिका आधी लोकांनी परिश्रम घेतले सदर सप्ताहातून एका नव्या वातावरण आणि मार्गांची विद्यार्थ्यांना ओळखून नवीन शिक्षा धोरण स्वरूप विद्यार्थ्यांना माहिती घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असल्याचे येथील शिक्षक वृंद यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!