HomeनांदेडNutrition for Mor Chowk - मोर चौक ते वाडी रस्त्यासाठी कृति समितीचे...

Nutrition for Mor Chowk – मोर चौक ते वाडी रस्त्यासाठी कृति समितीचे आज उपोषण -NNL

नांदेड l मोर चौक ते वाडी बुद्रुक रस्त्याच्या मागणीसाठी नागरिक कृती समितीच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मोर चौक परीसरात सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाज वाजेपर्यंत हे उपोषण सुर रहाणार असून नागरीकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे .

IMG 20240728 WA0042 Nutrition for Mor Chowk - मोर चौक ते वाडी रस्त्यासाठी कृति समितीचे आज उपोषण -NNL

मारे चौक ते वाडी बु. हा या भागातील मुख्य व नांदेड शहराला जोडणारा रहदारीचा रस्ता आहे. सध्या ह्या रस्त्याची खड्डे पडून चाळन झाली आहे. नामांकीत शाळा, खाजगी क्लासेस यामुळे महिला, विद्यार्थी यांची मोठी ये जा असते. खराब रस्यामुळे दररोज अनेकांचे अपघात होत आहेत. सदरील रस्ता दुरस्त करण्यात यावा या मागणीसाठी वाडी बु नागरीक कृती समितीच्या वतीने सुमारे तीन हजार सहयांचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते.

त्यानंतर पुन्हा एकदा निवेदन देऊनही प्रशासनाने लोक भावनेला केराची टोपली दाखवली. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांच्या वतीने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा यासाठी आज सोमवारी एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करण्यात येणार आहे. यानंतरही हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शिंदे, सचिव विजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष संकेत जमदाडे,उपाध्यक्ष वसंत कऱ्हाळे, नंदकुमार बनसोडे, किरन नाईक, बी.बी एंगडे यांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments