Homeक्राईमSuicide by hanging Police Patil | हदगाव तालुक्यातील पेवा गावच्या पोलीस पाटलाने...

Suicide by hanging Police Patil | हदगाव तालुक्यातील पेवा गावच्या पोलीस पाटलाने केली गळफास घेऊन आत्महत्या -NNL

पोलिस उपनिरीक्षक बडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडिओमध्ये केला

नांदेड| हदगाव तालुक्यातील एका गावाच्या पोलिस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवून पोलिस उपनिरीक्षक माझ्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केला. दरम्यान, नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह आता पोलिस ठाण्यात नेला. हि घटना हदगाव तालुक्यातील पेवा गावातील आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे पेवा गावचे पोलिस पाटील असलेले बालाजी जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात हदगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पेवा येथील पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली. माझ्या मृत्युला पोलिस उपनिरीक्षक बडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडिओमध्ये केला आहे. बडीकर यांनी माझ्यावर अन्याय करायला नको होता, मी त्या घटनेची माहिती देऊनही माहिती लपवली असा रिपोर्ट त्यांनी केला, असे मृत बालाजी हे व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.

याबाबत अधिक माहिती घेतली असता, 15 दिवसापूर्वी पेवा या गावात एकाचा खून झाला होता. जातीय वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येते, याच घटनेतील आरोपीबद्दल पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी माहिती लपवली असा वरिष्ठ पोलिसांचा समज होता. त्यातून पोलीस उपनिरिक्षक बडीकर यांनी बालाजी जाधव यांना विचारणा केली होती. पण, आपल्यावर खोटा आरोप होत असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असा आरोप आता होत आहे.

या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणल्याचं पाहायला मिळालं. तसेच, संबंधित वरिष्ठ पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी व बालाजी यांच्या कुटुंबीयांना केली आहे. मात्र, या घटनेमुळे पोलीस खात्यात आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबतची सखोल चौकशी सुरू असून,अद्यापही पोलीस दप्तर या घटनेची नोंद झाली नसल्याची समजते आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments