HomeनांदेडAll the three streams of Sahasrkund waterfall are running | सहस्रकुंड धबधब्याच्या...

All the three streams of Sahasrkund waterfall are running | सहस्रकुंड धबधब्याच्या तीनही धारा सुरू.. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी – NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| पक्षाच्या किलबिलाटासह वेली फुलाने नटलेला निसर्गरम्य हा सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधबा गेल्या अनेक महिन्यापासून पाण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र आज सकाळपासून पावसाने चांगलीच सुरवात केल्याने हा सहस्रकुंड धबधबा आता धो धो व्हायला सुरुवात झालाय..

IMG 20240720 WA0023 All the three streams of Sahasrkund waterfall are running | सहस्रकुंड धबधब्याच्या तीनही धारा सुरू.. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी - NNL

मराठवाडा आणि विदर्भाची सीमा दर्शवणारी पैनगंगा नदी आणि या पैनगंगा नदीतून उदयास आलेला हा निसर्गरम्य सहस्त्रकुंड धबधबा येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पाडणारा धबधबा गेल्या दीड महिन्यापासून पाण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र सकाळपासूनच पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने या सहस्रकुंड धबधब्याच्या तिन ही धारा सुरू झाल्या आहेत.

हा सहस्रकुंड धबधबा नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात हा सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी येतात. या सहस्त्रकुंड धबधब्याच्या तिन्ही धारा तब्बल दिड महिन्याने सुरू झाल्याने आता हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments