HomeनांदेडChildren's heart disease screening camp today । आज लोटस हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे...

Children’s heart disease screening camp today । आज लोटस हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे हृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन -NNL

दि. १९ जुलै २०२४,शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजेपासून शिबिराला सुरुवात

नांदेड। येथील डॉक्टर लाईन भागातील लोटस हॉस्पिटलमध्ये दिनांक १९ जुलै २०२४,शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजेपासून महात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत लहान मुलांच्या हृदयरोगाचे मोफत निदान व उपचार शिबीर व लहान मुलांच्या हृदयातील छिद्र बंद करण्याचे बिना टाक्याचे ऑपरेशन व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराची माहिती जिल्ह्यातील सर्व संबंधित मेडिकल ऑफिसर, आर.एच. पी.एस.सी., सब सेंटर, अंगणवाडी केंद्र यांच्या पर्यत पोहचवावी असे आवाहन लोटस चे संचालक डॉ संजय पडलवार यांनी केले आहे ..

याबाबत सविस्तर माहिती देतांना डॉ. संजय पडलवार यांनी सांगितले की, डॉक्टर लाईन येथील लोटस हॉस्पिटल येथे दि. १९ जुलै २०२४,शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजता लहान मुलाच्या हृदयरोगाचे मोफत निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हैद्राबाद येथील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. सुदीप वर्मा (पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट) व नांदेड येथील लहान मुलांचे हृदयविकार तज्ञ डॉक्टर दीपक एकलारे हे रुग्णाची तपासणी व प्रोसिजर करणार आहेत. यामध्ये 2D ECHO, PDA, ASD, VSD, Device closer procedures. इ. सुविधा महात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत.तरी या शिबिरासाठी हृदयविकारांची लक्षणे असणाऱ्या मुलांना आवश्य दाखविण्यात यावे.

तसेच या शिबिराची माहिती आपल्या मार्फत जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचवून शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती लोटस हॉस्पिटल व्यवस्थापक यांनी केली आहे..

लहान मुलांच्या हृदयाचे छिद्र बंद करण्याचे विना टाक्याचे ऑपरेशन उपचार मोफत शिबिर…!

लोटस हॉस्पिटल नांदेड – दिनांक १९ जुलै २०२४ , शुक्रवार रोजी सकाळी ८.०० पासुन (आवश्यक कागदपत्रे :रेशन कार्ड, मुलाचे आधार कार्ड, मुलाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र..) – लहान मुलांच्या हृदयरोग तपासणी शिबिरात सहभागासाठी संपर्क : लोटस हॉस्पिटल , डॉक्टर लाईन , नांदेड 7057981987 / 02462-246677

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments