HomeनांदेडNanded Merchants Bank | नांदेड मर्चंटस् बँकेची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा...

Nanded Merchants Bank | नांदेड मर्चंटस् बँकेची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिमाखात संपन्न – NNL

नांदेड| दि नांदेड मर्चंटस् को-ऑप बँकने सर्व सभासदांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढला असून बँकेचे सभासदांना नऊ टक्के लाभांश दिला आहे .बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ कार्य करीत असून लवकरच १५ शे कोटींचा व्यवहार टप्पा बँक पार करेल .सभासद ग्राहक यांनी जो विश्वास दाखवला आहे त्यास संचालक मंडळ तडा जाणार नाहीत असा विश्वास बँकेचे चेअरमन दिलीप कंदकुर्ते यांनी व्यक्त केला.

नांदेड मर्चंटस बॅकेची ची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा १४ जुलै 2024 रोजी नांदेड शिवाजीनगर येथील हॉटेल विसावा पॅलेस येथे बँकेचे. अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या वेळी बँकेचे माजी आमदार श्री गंगाधररावजी पटणे, बँकेचे अध्यक्ष श्री दिलीप कंदकुर्ते, उपाध्यक्ष श्री लक्ष्मण संगेवार, श्री ज्ञानेश्वर महाजन, सौ. वसुधा तगडपल्ले, श्रीमती प्रभादेवी देव, श्री ओमप्रकाश राखेवार, श्री रविकुमार कासलीवाल, श्री गणेश चिटमलवार, श्री दिपक चन्नावार, श्री अरूण चालिकवार, श्री श्रीकांत वट्टमवार, श्री हरिहर धुतमल व श्री विजय वट्टमवार तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी श्री रमाकांत बुवा व मान्यवर उपस्थित होते

बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यानी वर्ष 2023-2024 मधील अहवाल वाचन केले त्यात नमूद विषयास उपस्थित सभासदांनी एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली वर्ष 2023-2024 या वर्षासाठी संचालक मंडळाने 9 टक्के लाभांष जाहिर केला आहे.आणि वर्षीक सर्वसाधारण सभा सुरू असतानाच सभासदांच्या बचत खात्यात लाभांश जमा झाला आहे.

मार्च 2024 अखेर बँकेचा एकूण व्यवसाय 1200 कोटींचा झाला असून 1500 कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू आहे , बँकेचा एनपीए 0.19 टक्के इतका आहे ही माहिती बँकेचे सीईओ यांनी उपस्थित सभासदांना बँकेने मोबाईल बँकींग, क्युआर कोड, आयएमपीएस इ. सेवा ग्राहकांसाठी कार्यान्वीत केल्या आहेत.बँक राष्ट्रीयकृत बँका ग्राहकांना ज्या सुविधा देत आहे त्याच धर्तीवर आपली बँक सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. ग्राहकांनी बँक सुविधांचा लाभ घ्यावा असे बँकेचे अध्यक्ष -उपाध्यक्ष यांनीं उपस्थित सभासदांना सांगितले बँकेच्या प्रगती तसेच प्रशासन व्यवस्थापना बाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले.

वर्ष 2023-2024 या वर्षात बँकेच्या सर्व सभासदांचा एक लक्ष रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. सभासदांचे हित लक्षात घेणारी आपली पहिलीच बँक होय .या निर्णयाचे सभासदांनी स्वागत केले आहे . सभासदांनी उपस्थित केलेल्या शंकाचे तसेच प्रश्नाचे बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी निराकरण केले तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्याचा सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.माजी आमदार गंगाधर पटणे, जेष्ठ पत्रकार रवींद्र कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला जेष्ठ सभासद माजी आमदार गंगाधर पटणे हे बँकेची वाटचाल अत्यंत चांगल्या प्रकारे चालू असून त्यांनी बँकेची बिलोली येथे शाखा काढावी अशी सूचना केली .त्यांनी बँकेच्या माजी अध्यक्ष स्व .रामेश्वर बियाणी , स्व. नारायणरावजी चन्नावार यांच्या कार्याचा गौरव करत त्याच्या गत कालीन आठवणींना उजाळा दिला. बँकेच्या प्रगती बाबत विद्यमान अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व सर्व संचालक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.

आरंभी सभेची सुरूवात सरस्वती पूजन व दिपप्रज्वलनाने झाली अहवाल काळात दिवंगत झालेल्या माजी संचालक – सभासदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली वार्षिक सभेचे सुत्र संचलन बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री रमाकांत बुवा यांनी केले तर आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष श्री लक्ष्मण संगेवार यांनी मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments