HomeनांदेडCIDCO SCHOOL ESTATE SCHOOL STAFF'S CREDIT SOCIETY | सिडको शालेय वसाहतीतील शालेय...

CIDCO SCHOOL ESTATE SCHOOL STAFF’S CREDIT SOCIETY | सिडको शालेय वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्था सर्व साधारण सभा संपन्न, लाभांश वाटप -NNL

नवीन नांदेड| सिडको येथील शालेय वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्थेच्या नांदेड येथे सिडको वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्था मर्यादित सिडको नांदेडच्या सर्वसाधारण वार्षिक सभेच्या अनुषंगाने सर्व संचालक मंडळ व भागधारक सभासदांना प्रा.अनिल रसाळ ,प्रमाणित लेखपाल व सूर्यवंशी एस.एच.यांनी या सभेला अनमोल असे मार्गदर्शन केले तर या सभेला नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सिडकोचे रोखपाल राजकुमार देशमुख यांची उपस्थितीती होती.

सिडको येथील कुसुमताई विघायल येथे १४ जुलै रोजी पतसंस्थेच्या सर्व साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सचिव सूर्यवंशी एस.आर यांनी आपल्या प्रस्ताविकात पतसंस्थेचा इतिहास मांडून पतसंस्थेला घरघर लागेल की काय अशी अपेक्षा व्यक्त केले.

या सभेचे अध्यक्ष विलास बिरादार यांनी पतसंस्था वाढवण्यासाठी सभासदांनी ठेवी वाढवून सहकार्य करावे असे आव्हान केले आहे. या पतसंस्थेच्या देवाण-घेवान यातून दृढ मैत्री निर्माण होते.आणि एकमेकांच्या कुटुंबातील सुख दुःखात सामील होता येतेअसे उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल पतसंस्थेच्या सभासदांकडून पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन व गौरव आणि कौतुक होत आहे.या सभेला सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होता, यावेळी सभासद बांधवांना लाभांश त्यांच्या खात्यात जमा करून वाटप करण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments