HomeनांदेडGreenworm infestation | कापूस सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव शेतकरी हैराण...

Greenworm infestation | कापूस सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव शेतकरी हैराण -NNL

किनवट,परमेश्वर पेशवे। कापूस सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर हिरव्या आळीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनची कोवळी पिके फस्त केली जात असल्याने किनवट तालुक्यातील इस्लापूर कोसमेट वाळकी कोल्हारी शिवनी जलधरा बोधडी भागातील शेतकरी हैराण असल्याचे पहावयास मिळत आहेत.

मृर्ग नक्षत्रापासून सर्वसाधारण पावसाला सुरुवात झाली असताना या वर्षी मात्र कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. या अनुषंगाने शेतकरी पहिलाच हैराण असताना मात्र नांदेड किनवट तालुक्यातील इस्लापूर कोसमेट शिवणी जलधारा बोधडी या भागातील कापुस,सोयाबीन या कोवळ्या पिकावर तूडतूडा व हिरव्या आळीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनची कवळी पिके फस्त केली जात आहेत.

सोयाबीन व कापसावर झालेला अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
शेतकऱ्यांकडून विविध औषधांच्या फवारण्या करून या अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्याचे शर्यतीचे प्रयत्न चालू आहेत.
यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने किड्यांच्या उत्पतीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन कीटकनाशक सोयाबीनची उभी पिके फस्त करत आहेत.

बी बियाणाचे आणि खताचे भाव पाहता शेतकऱ्यांनी उसनवारी करून बी बियाणे खरेदी करत पेरणी केली आणि पिकेही जोमाने डोलू लागली मात्र ही कोवळी पिके कीटकनाशकामुळे संकटात आली आहेत त्यामुळे सोयाबीन वरील अळीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येवून प्रत्यक्षपणे पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना कीटक नाशका विषयी मार्गदर्शन करून उपाय योजना सुचवाव्यात अशी मागणी इस्लापूर, कोसमेट, वाळकी,कोल्हारी, शिवणी, जलधारा,भागातील शेतकरी नागोराव केशव हराळे, शिवाजी सिदमवाड, अहमद सिद्दिकी, गंगाधर जाधव कोल्हारीकर, गणेश बोडेवाड, शिवाजी नरसिंग राठोड उमाजी राठोड उत्तम फत्तु राठोड या शेतकऱ्यांनी केली आहे .

सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनची कोवळे पाने फस्त केली जात आहेत या हिरव्या आळीच्या विळख्यातून सोयाबीनचे पिके वाचवण्यासाठी कृषी विभागाने उपाय योजना सुचवाव्यात शेतकऱ्यांची मागणी.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments