Homeनांदेडdrain blockage | हिमायतनगरच्या वार्ड क्र ४ मधील नालीचे बाधकामास तत्काळ करून...

drain blockage | हिमायतनगरच्या वार्ड क्र ४ मधील नालीचे बाधकामास तत्काळ करून विहिरीचे कडे टाकून द्या – NNL

अन्यथा बैंडबाजा लावून आंदोलन करण्याचा काशिनाथ गड्डमवार यांनी दिला निवेदनाद्वारे इशारा

हिमायतनगर| नगरपंचायत वार्ड क्र ४ मधील नालीचे बाधकामास तत्काळ करून विहिरीचे कडे टाकून द्यावे. आणि या भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येपासून मुक्त करा. अन्यथा समस्थ नेहरूनगर नागरिकांना घेऊन नगरपंचायत कार्यालयापुढे बंड बाजा वाजवीत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात येईल. असा इशारा एका निवेदनाद्वारे काशिनाथ गड्डमवार यांनी दिला आहे.

हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र ४ मधील नालीचे पक्के बांधकाम करण्यात यावे म्हणून सातत्याने नगरपंचायत कार्यालयाला गेल्या दोन वर्षांपासून निवेदन देण्यात आले आहेत. परंतु आत्तापर्यंत कार्यालयाकडून प्रत्यक्षरित्या वॉर्ड क्रमांक ४ मधील कामास सुरुवात झाली नाही. आमच्या भागातील नागरिकाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जनहितार्थ मागणी निवेदन अर्ज सातत्याने वारंवार देत आहे. परंतु जाणीवपूर्वक निवेदनाची दखल घेतल्या जात नाही.

तसेच नगरपंचायत कार्यालयाकडून अर्जाच्या निवेदनाच्या अनुषगाने प्रत्यक्षरित्या नालीचे बांधकाम करण्यास सुरुवात झाली नाही. आम्हाला शासनाने दिलेल्या नियम तोडण्याची वेळ येऊ नये म्हणून तात्काळ वॉर्ड क्रमांक ४ मध्ये नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा दि 1/08/2024 रोजी समस्थ नेहरूनगर नागरिकांना घेऊन नगरपंचायत कार्यालयापुढे बैंड वाजवून निषेध आंदोलन करण्यात येईल. असेही कार्यालयीन अधीक्षक श्री महाजन याना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार हिमायतनगर, नगरपंचायत मुख्य अधिकारी, हिमायतनगर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिमायतनगर याना देण्यात आले आहे. यावेळी काशिनाथ गड्डमवाड, योगेश चिलकावार, बालाजी ढोणे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments