drain blockage | हिमायतनगरच्या वार्ड क्र ४ मधील नालीचे बाधकामास तत्काळ करून विहिरीचे कडे टाकून द्या – NNL
हिमायतनगर| नगरपंचायत वार्ड क्र ४ मधील नालीचे बाधकामास तत्काळ करून विहिरीचे कडे टाकून द्यावे. आणि या भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येपासून मुक्त करा. अन्यथा समस्थ नेहरूनगर नागरिकांना घेऊन नगरपंचायत कार्यालयापुढे बंड बाजा वाजवीत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात येईल. असा इशारा एका निवेदनाद्वारे काशिनाथ गड्डमवार यांनी दिला आहे.
हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र ४ मधील नालीचे पक्के बांधकाम करण्यात यावे म्हणून सातत्याने नगरपंचायत कार्यालयाला गेल्या दोन वर्षांपासून निवेदन देण्यात आले आहेत. परंतु आत्तापर्यंत कार्यालयाकडून प्रत्यक्षरित्या वॉर्ड क्रमांक ४ मधील कामास सुरुवात झाली नाही. आमच्या भागातील नागरिकाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जनहितार्थ मागणी निवेदन अर्ज सातत्याने वारंवार देत आहे. परंतु जाणीवपूर्वक निवेदनाची दखल घेतल्या जात नाही.
तसेच नगरपंचायत कार्यालया...
