Homeक्राईमtheft arrested | जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपीस अटक -NNL

theft arrested | जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपीस अटक -NNL

नांदेड। दिनांक 05.07.2024 रोजी रात्री 10.30 वा. चे सुमारास खुराना ट्रॅव्हल्स समोर दोन अज्ञात इसमांनी एका इसमाचा जबरीने मोबाईल हिसकावुन नेला होता. त्या मोबाईलवर फिर्यादीने पुन्हा संपर्क केला असता आरोपीतांनी तो मोबाईल परत देण्यासाठी फिर्यादीकडुन फोन पे वर रु. 11,000/- खंडणी स्वरुपात मागणी करुन स्विकारली. सदर प्रकरणी पो. स्टे. वजिराबाद येथे गु.र.नं. 303/2024 कलम 308 (2), 309(4), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील अनओळखी आरोपीतांचा शोध घेणे बाबत मा. पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करुन, त्यांना सदर आरोपीतांचा शोध घेणे बावत सुचना दिल्या होत्या.

दिनांक 10.07.2024 रोजी सहा. पोलीस निरीक्षक श्री. संतोष शेकडे यांचे पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन नांदेड शहरातील संशईत इसम नामे राहुल प्रदिप जाधव रा. शिवनगर, बायपास रोड, नांदेड यास ताब्यात घेवुन, त्यास विश्वासात घेवुन, जबरी चोरीचे गुन्हयासंबधाने सखोल विचारपुस केली.

यावेळी त्याने त्याचा साथीदार नामे किशन रमेश सुर्यवंशी वय 24 वर्ष रा. शिवनगर, बायपास रोड, नांदेड याने मिळुन पो. स्टे. वजिराबाद गु.र.नं. 303/2024 कलम 308(2), 309(4), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 हा गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे. त्याचेकडुन गुन्हयातील 1. चोरलेला मोबाईल 2. तो मोबाईल परत करण्यासाठी खंडणी स्वरुपात फिर्यादीकडुन घेतलेली रक्कम रु. 11,000/- व 3. गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण रु. 81,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, गुन्हयातील त्याचा साथीदार किशन रमेश सुर्यवंशी रा. शिवनगर, बायपास रोड, नांदेड याचा शोध चालु आहे. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी नामे राहुल प्रदिप जाधव रा. शिवनगर, बायपास रोड, नांदेड व जप्त मुद्देमाल पो. स्टे. वजिराबाद गु.र.नं. 303/2024 कलम 308(2), 309 (4), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 या गुन्हयाचे पुढील तपास कामी पो. स्टे. वजिराबाद यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, भोकर खंडेराव धरणे, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्था.गु.शा. नांदेड, सहा. पोलीस निरीक्षक, संतोष शेकडे, पोलीस अंमलदार बंडु कलंदर, किशन मुळे, मोतीराम पवार, तानाजी येळगे, इसराईल शेख, साहेबराव कदम, अनिल बिरादार, महेश बडगु व चालक अर्जुन शिंदे यांनी पार पाडली आहे. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कामगीरीचे कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments