Vanchit Bahujan Aghadit entry | हिमायतनगर तालुक्यातील माजी सभापतीचे यजमान दिलीप राठोड यांचा वंचित मध्ये प्रवेश – NNL

नांदेड/हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मायाताई राठोड यांचे यजमान दिलीप राठोड यांनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राठोड यांच्या पक्ष प्रवेशाने वंचित आघाडीमध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून, काँग्रेसला मात्र आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे काँग्रेसच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांतून बोलल्या जात आहे.


हिमायतनगर तालुक्यात काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सोबत दरेसरसम येथील राठोड बंधू गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात. माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड हे आमदार जवळगावकर यांचे पहिल्या फळीतील विश्वासू सहकारी म्हणून सुपरिचित आहेत. तसेच त्यांचे बंधू दिलीप राठोड हे काँग्रेस पक्षातच राहून काम करीत आले आहेत. गेल्या पंचवार्षिक मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत दिलीप राठोड यांच्या पत्नी निवडून आल्या. त्यांना थेट पंचायत समितीच्या सभापती पदाची ऑफर मिळाली. त्यांच्या सभापती पदाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर राठोड हे काँग्रेस मध्ये अस्वस्थ होते.

अखेर त्यांनी काँग्रेस पक्षाला अखेरचा रामराम करून वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे. विधान सभेची निवडणूक हे येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये लागण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राठोड यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी व वंचित बहुजन आघाडीमध्ये केलेला प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात असून, स्थानिक काँग्रेस पक्षाला मात्र आता आत्मपरीक्षण करावे लागेल. असे काँग्रेसच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांतून बोलल्या जात आहे.


त्यांनी दि.11 रोजी हाटेल ताज पाटील येथे नांदेड जिल्हा अध्यक्ष, बहुजनांचे कैवारी आदरणीय श्रेदेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू नांदेड जिल्हाचा ढाण्या वाघ सन्माननीय डॉ राजेश्वर हतीअंबिरे पालमकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक सन्माननीय सर्वजित बनसोडे साहेब यांच्या उपस्थितीत हिमायतनगर तालुक्यातील पंचायत समिती माजी सभापती सौ.मायाताई दिलीप राठोड यांचे प्रतिनिधी दिलीप राठोड यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तसेच आगामी हादगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत पक्षाने जर उमेदवारी दिली तर निवडणूक पुर्ण ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच त्यांनी तात्काळ 10,000 रूपयांची सदस्य नोंदणी करून पक्षाकडे अर्ज केला. यावेळी अमर हतीअंबिरे जिल्हा सदस्य,राजु वाठोरे जिल्हा सहसचिव, मा. तालुकाध्यक्ष डॉ रविराज दुधकावडे, तालुका उपाध्यक्ष संतोष खिलारे, हादगाव तालुका अध्यक्ष हिदायत खान, भोकर तालुका अध्यक्ष दिलीप राव,भोकर शहरध्यज्क्ष शेख रहीम, तालुका उपाध्यक्ष शिवाजी जपलवाड , मुदखेड तालुका अध्यक्ष मोहन कांबळे, नांदेड तालुका अध्यक्ष मुकिंद नरवाडे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.



