Homeनांदेडपदाधिकाऱ्यांनी नव मतदार नोंदनी अभियानात हिरीरीने सहभाग घ्यावा - संदीप राठोड -NNL

पदाधिकाऱ्यांनी नव मतदार नोंदनी अभियानात हिरीरीने सहभाग घ्यावा – संदीप राठोड -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। निवडणूक आयोगातर्फे दि.२५ जुलै २०२४ पर्यंत मतदार नोंदणी अभियान चालविल्या जात आहे.

त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील भाजपा युवा मोर्चाच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभियानात हिरीरीने सहभाग घेऊन अधिकाधिक नव मतदारांच्या नावाची मतदार यादीत नोंद करावी. असे आवाहन नांदेड जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप राठोड यांनी केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे नव मतदार नोंदणी अभियान राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार विधानसभा निहाय ५,००० नव मतदारांच्या नावाची मतदार यादीत नोंद करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभियानात आपले मोलाचे योगदान द्यावे, अशी विनंती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप राठोड यांनी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments