Homeनांदेड४० भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची...

४० भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिस -NNL

नांदेड| पहिल्या सोमवारी गेल्या ४६ महिन्यापासून घेण्यात येत असलेला कायापालट हा उपक्रम कडाक्याची थंडी असो अथवा मुसळधार पाऊस अखंडितपणे सुरू असून आतापर्यंत जगावेगळ्या या उपक्रमात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दोन हजारापेक्षा जास्त भ्रमिस्टांची अंतर बाह्य स्वच्छता केल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. यावेळी ४० भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळ वितरित करण्यात आले.

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, ला. योगेश जैस्वाल यांचे मार्गदर्शन मिळत असते. सोमवारी पहाटे शहरातील विविध भागातून भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना सुरेश शर्मा, अरुणकुमार काबरा, कामाजी सरोदे,संजयकुमार गायकवाड यांनी स्वतःच्या दुचाकी वर बसवून गोवर्धन घाट पुलाखाली आणले. स्वयंसेवक राजूअण्णा पस्पुनुर यांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली.कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली.

कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना निलेश यांने साबण लावून स्नान घातले.त्यानंतर सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ.पी.सुदर्शन, स्नेहलता जायसवाल, गोविंद भुतडा यांच्या हस्ते अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आले. ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावे म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था केली होती.पूर्वीचे मळके कपडे,अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून त्यांना स्वतःला नवल वाटले. डॉ. दि.बा. जोशी यांच्या स्टाफने आजारी असलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांची मलमपट्टी केली.

Picsart 24 07 02 05 30 38 379 ४० भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिस -NNL
 

मोफत औषधे दिली. एका भ्रमिस्टाची कंबर फॅक्चर झाल्यामुळे त्याला कंबर बेल्ट लावणे आवश्यक होते. परंतु पैशाची व्यवस्था होत नसल्यामुळे कित्येक महिन्यापासून तो त्रासात होता. ही बाब त्याने दिलीप भाऊंना सांगितली. हे पाहून हैदराबादच्या स्नेहलता जायसवाल यांनी कंबर बेल्ट साठी आर्थिक मदत केली. दिलीप ठाकूर यांनी स्वतःच्या गाडीवर त्या भ्रमिष्ठाला घेऊन त्याला पाहिजे असलेला योग्य कंबर बेल्ट घेऊन दिला.कायापालट उपक्रम संपल्यानंतर ॲड.चिरंजीलाल दागडिया यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराची स्वच्छता करण्यात आली.

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी त्याची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments