हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रभू श्रीराम यांच्यावरील अपार श्रद्धा आणि भारतभ्रमणाचा संकल्प मनाशी बाळगून उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्याचे रहिवासी शिवम हे सायकलने भारतभ्रमण करत आहेत. २२ जून २०२४ पासून सुरू झालेल्या या प्रवासादरम्यान अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत पोहोचण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे.


या प्रवासादरम्यान शिवम हे माहूरमार्गे हिमायतनगर (वाढोणा) शहरात दाखल झाले. येथील श्री परमेश्वर मंदिरात त्यांचा मुक्काम होता. यावेळी त्यांची भेट घेऊन भाजपा युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी प्रवासाची माहिती जाणून घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



हिमायतनगर येथून शिवम हे औंढा नागनाथमार्गे पुढील प्रवासाला निघाले आहेत. प्रभू श्रीरामांवरील श्रद्धा, जिद्द आणि सायकलने देशभ्रमण करण्याचा त्यांचा संकल्प नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. यावेळी रामभाऊ सूर्यवंशी, कात्रे मामा, नारायण माने, आशुतोष बोरेवाड, धोंडोपंत बनसोडे, मनोज पाटील, ज्ञानेश्वर कोरडे, अनिल सूर्यवंशी, विशाल कदम, आदित्य मुत्तलवाड, आदिसह परमेश्वर मंदिरातील कर्मचारी भाविक उपस्थित होते.

