Homeधार्मिक‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात हिमायतनगरच्या माता कालिंका मंदिरात घटस्थापना

‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात हिमायतनगरच्या माता कालिंका मंदिरात घटस्थापना

अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सवाचा थाटात प्रारंभ; माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक, महापूजा व आरती

हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार|  ‘उदे गं अंबे उदे’, ‘कालिंका माता की जय’च्या जयघोषाने हिमायतनगर (वाढोणा) शहराची कुलस्वामिनी श्री माता कालिंका देवी मंदिर परिसर भक्तिमय झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर रविवारी घटस्थापना करून नवरात्रोत्सवाचा थाटात प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक, महापूजा, आरती आणि देवीचा अलंकार सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. मंदिरात सकाळी १० वाजता पुरोहित कांता गुरु वाळके आणि साईनाथ बडवे यांच्या मधुर वाणीतून देवीचा अभिषेक सोहळा संपन्न झाला. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सपत्नीक उपस्थित राहून श्री माता कालिंका देवीचा अभिषेक, महापूजा व आरती केली. त्यानंतर देवीचा अलंकार सोहळा पार पडला. आरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत ह.भ.प. सत्यदेवजी महाराज भांबुलकर यांच्या ओजस्वी वाणीतून संगीतमय देवी भागवत पुराण कथेचे निरूपण होणार आहे. तसेच वेदशास्त्रसंपन्न कांता गुरु वाळके यांच्या मधुर वाणीतून दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री सप्तशती पाठाचे वाचन केले जाणार आहे.
IMG20261011113814 01 ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात हिमायतनगरच्या माता कालिंका मंदिरात घटस्थापना
oplus_0
या धार्मिक सोहळ्याला श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष तथा नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद गुंडेवार, प्रवीण जन्नावार, प्रमोद तुपतेवार, श्यामअण्णा मारुडवार, भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, राम नरवाडे, प्रवीण कोमावार, मनोज मादसवार, नारायण गुंडेवार, गोविंद बंडेवार, सुभाष शिंदे, रामराव पाटील कार्लेकर, गजानन मादसवार, नागनाथ गुंडेवार, कालिंका मंदिराचे अध्यक्ष राजू रामदिनवार, सचिव संजय मारावार, संचालक शरद चायल, व्यंकटी पालिकुंडलवाड, राजू जयस्वाल, रामकृष्ण मादसवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, संगीता साखरकर, पापा पार्डीकर, धर्मपुरी गुंडेवार, सुरज दासेवार, जितू सेवनकर, पंडित ढोणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
IMG20261011113850 01 ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात हिमायतनगरच्या माता कालिंका मंदिरात घटस्थापना
oplus_0
महिला मंडळाच्या वतीने नागमणी रामदिनवार, सुनंदा दासेवार, सुमनबाई तिम्मापुरे, यशोदा मादसवार, अंजली मादसवार, सुलोचना गुंडेवार, स्वाती यशवंतकर, शांताबाई चाटलेवार, मालाबाई भिसेकर, रेखा मादसवार, सविताबाई गुड्डेटवार, आशाबाई चवरे आदींसह शेकडो महिला व पुरुष भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली.
भक्तनिवासाचे भूमिपूजन आणि महाआरतीचे आयोजन
नवरात्रोत्सवाच्या पुढील कार्यक्रमांत अष्टमीला म्हणजे दिनांक 19 सोमवारी हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते देवींची आरती करून नूतन  भक्तनिवासाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. तसेच नवमीच्या दिवशी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते देवीचा अभिषेक व महाआरती होणार असून, सात दिवस चालणाऱ्या देवी भागवत कथेचे आयोजन आमदार बाबुराव कदम यांनी केले आहे.
IMG20261011104920 01 ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात हिमायतनगरच्या माता कालिंका मंदिरात घटस्थापना
oplus_0
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत माता कालिंकेच्या दर्शनासाठी शहरासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दाखल होण्याची अपेक्षा असून, मंदिर कमिटीच्या वतीने सर्व भाविकांना धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments