नव-याला जिवे मारण्याची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार.. सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल; आरोपीस अटक -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। नव-याला जिवे मारण्याची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार केल्याची खळबजनक घटना दि. १ जुलै रोजी घडल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली आहे..

माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे सेलू – गंगाजीनगर येथील एका ३३ वर्षीय विवाहितेने सिंदखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबाप्रमाणे ती विवाहिता दि. १ जुलै २०२४ रोजी सेलू वरून गंगाजीनगरकडे जात असताना सेलू येथील आरोपीच्या जुन्या घराजवळ ती महिला आल्यानंतर आरोपीने तिच्या नव-याला जिवे मारण्याची धमकी दिली. तद्नंतर त्या महिलेला आरोपीच्या रस्त्यालगत असलेल्या जुन्या घरी नेवून अत्याचार केल्याची फिर्याद सदर पिडीत विवाहीतेने सिंदखेड पोलीस ठाण्यात दिली आहे..

दरम्यान विवाहितेच्या तक्रारीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५७/२४ कलम ६४ (१), १२७ (२), ३५१ (२) (३) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे पवन लक्ष्मण गायकवाड वय २६ रा. गंगाजीनगर ता. माहूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सिंदखेड पोलीस ठाण्यात नव्याने रूजू झालेले सहायक पोलीस निरिक्षक आर.बी. जाधवर हे करीत आहेत.

१ जुलैपासून लागू करण्यात आलेल्या भारतीय न्यायसंहितेच्या कायद्यानुसार सिंदखेड पोलीस ठाण्यातील हा पहिलाच गुन्हा असून अशा स्वरूपाच्या गुन्ह्यातील कायद्यात झोलेले बदल व नवीन कायद्यानुसार राखावयाची गोपनीयताा यामुळे प्रकरणातील अधिकची माहिती प्राप्त होवू शकली नाही.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button