Homeधार्मिकलोह्यात हिना पांचाळ, सुरभी हांडे यांच्या उपस्थितीत दहीहंडीचा थरार

लोह्यात हिना पांचाळ, सुरभी हांडे यांच्या उपस्थितीत दहीहंडीचा थरार

गंगाखेडच्या गोविंदा पथकाने पटकावले प्रथम पारितोषिक; लोह्याच्या जय बजरंग पथकाला द्वितीय क्रमांक

लोहा| लोहा शहरात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अविनाश पाटील पवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी महोत्सवात गोविंदा पथकांनी थरारक सलामी देत उपस्थितांची मने जिंकली. लक्ष्मी सुपर मार्केट परिसरात शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी झालेल्या या दहीहंडी महोत्सवाचे हे दहावे वर्ष होते.

यंदाच्या महोत्सवाला सिनेअभिनेत्री हिना पांचाळ आणि सुरभी हांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या नृत्याविष्काराने तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दहीहंडी स्पर्धेत लोहा, कंधार, गंगाखेड यांसह विविध ठिकाणच्या गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या वातावरणात स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे आयोजन निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्यात आले. गंगाखेडच्या गोविंदा पथकाने ७१ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. तर लोहा येथील जय बजरंग गोविंदा पथकाने ५१ हजार १११ रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळविले.

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात युवानेते प्रविण पाटील चिखलीकर, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रणिताताई देवरे-चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, लोहा नगराध्यक्ष शरद पाटील पवार, उपाध्यक्ष करीम शेख मुजावर, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, दत्ता वाले, गटनेते भास्कर पवार, नगरसेवक हरीभाऊ चव्हाण, नामदेव कटकमवार, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक अविनाश पाटील पवार, नगरसेवक प्रा. रासाब मंजलवाड, नारायण येलरवाड, सतीश निखाते, केतन खिल्लारे, सुधाकर पाटील पवार, शहाजी पवार, सचिन मुकादम, दीपक पाटील कानवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. दहीहंडी महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आमदार चिखलीकर यांनी आयोजक अविनाश पाटील पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. अभिनेत्री हिना पांचाळ आणि सुरभी हांडे यांच्या उपस्थितीमुळे तसेच गोविंदा पथकांच्या चित्तथरारक कामगिरीमुळे लोह्यातील दहीहंडी महोत्सवाला उत्साहाचे आणि जल्लोषाचे स्वरूप प्राप्त झाले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments