Homeनांदेडमराठा आरक्षणासाठी हिमायतनगर कडकडीत बंद

मराठा आरक्षणासाठी हिमायतनगर कडकडीत बंद

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा; बाजारपेठेतून घोषणाबाजी करत रॅली, तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन

हिमायतनगर, अनिल मादसवार | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दिनांक 11 सप्टेंबर रोजी हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. सकल मराठा समाजाच्या आवाहनाला व्यापारी वर्गासह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने दिवसभर शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहिली.

आरक्षणाच्या मागण्या तातडीने मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्यामार्फत शासनाला देण्यात आले. यावेळी समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. रॅलीचा समारोप श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे करण्यात आला.

FB IMG 1789115504134 मराठा आरक्षणासाठी हिमायतनगर कडकडीत बंद

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका मांडत शासनाने आंदोलकांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तसेच मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सोडविण्यासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे, असा ठराव मांडण्यात आला. दरम्यान, बंद शांततेत पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंदमुळे नेहमी गजबजलेल्या हिमायतनगर बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट दिसून आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments