Homeनांदेडपदापेक्षा समाजाचा न्याय मोठा! वामनराव पाटील वडगावकरांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा

पदापेक्षा समाजाचा न्याय मोठा! वामनराव पाटील वडगावकरांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला जाहीर पाठिंबा; सत्ताधारी पक्षात असूनही रोखठोक भूमिका

हिमायतनगर, अनिल मादसवार| “पद येतील-जातील; मात्र समाजाचा न्याय आणि स्वाभिमान सर्वांत मोठा!” अशी स्पष्ट भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी आपल्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजाच्या न्यायासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संघर्षाला जाहीर समर्थन देत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे आपल्या राजीनामा पत्रातून स्पष्ट केले आहे.

सत्ताधारी पक्षाचा तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना समाजाच्या न्यायाच्या प्रश्नावर गप्प बसणे आपल्याला मान्य नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. “समाजाच्या हक्कासाठी ठाम भूमिका घ्यायची असेल, तर पदाला चिकटून राहण्यापेक्षा पदाचा राजीनामा देऊन संघर्षात सहभागी होणे योग्य,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी आक्रमक काम – वामनराव पाटील वडगावकर यांनी हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी सातत्याने आंदोलने, उपोषणे आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवर संघर्ष केला. सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

FB IMG 1788507241258 पदापेक्षा समाजाचा न्याय मोठा! वामनराव पाटील वडगावकरांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा

नगरपंचायत निवडणुकीच्या काळातही त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनातील कथित गैरप्रकार व भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला, त्यामुळे तालुक्यात त्यांची रोखठोक कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झाल्याचे समर्थक सांगतात.

राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
एकीकडे सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आणि दुसरीकडे समाजाच्या प्रश्नावर संघर्ष, या दोन्हीमध्ये त्यांनी समाजाच्या न्यायाला प्राधान्य दिल्याने त्यांच्या राजीनाम्याची हिमायतनगरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

“सत्तेच्या सावलीत राहण्यापेक्षा समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणे पसंत केले,” असा संदेश या निर्णयातून गेल्याची प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
मराठा समाजाच्या प्रश्नावर घेतलेल्या या निर्णयामुळे वामनराव पाटील वडगावकर यांच्या भूमिकेचे समर्थकांकडून कौतुक होत असून, ‘निडर, धाडसी आणि रोखठोक नेतृत्व’ अशी भावना व्यक्त केली जात आहे. पदाचा त्याग करून समाजाच्या न्यायासाठी संघर्षाची वाट निवडल्याने वडगावकरांच्या राजीनाम्याने हिमायतनगरच्या राजकारणात नवा राजकीय संदेश दिला आहे.🔥 एक मराठा, लाख मराठा! 🔥

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments