Homeनांदेडबैल चारविताना काळाचा घाला! विषारी सापाच्या दंशाने भारुडी-भजन सम्राट मुकुंदराव नखाते यांचे...

बैल चारविताना काळाचा घाला! विषारी सापाच्या दंशाने भारुडी-भजन सम्राट मुकुंदराव नखाते यांचे निधन

शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर; वाईवाडी परिसरात हळहळ

हिमायतनगर, प्रतिनिधी| तालुक्यातील वाईवाडी येथील शेतकरी तथा भारुडी-भजन सम्राट मुकुंदराव सटवा नखाते (वय ५६) यांचा विषारी सापाच्या दंशाने उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने वाईवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भजन-भारुडी क्षेत्राने एक हसतमुख व कलाप्रेमी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदराव नखाते हे २५ ऑगस्ट रोजी दिवसभर शेतात काम करून सायंकाळच्या सुमारास बैल चारविण्यासाठी शेत परिसरात गेले होते. यावेळी त्यांना विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी तातडीने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलविले.

मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच २६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे सहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली.

भारुडी-भजनातून समाजप्रबोधन करणारे कलाकार

मुकुंदराव नखाते हे शेती व्यवसायासोबतच भारुडी आणि भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे कलाकार म्हणून परिसरात परिचित होते. आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक संदेश देत जनजागृती करण्याचे काम केले. त्यांच्या निधनामुळे भजन-भारुडी क्षेत्रासह शेतकरी वर्गातूनही हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या आकस्मिक निधनाने नखाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. दरेसरसम येथील माजी सरपंच रामराम पाटील भिसे यांचे ते मेव्हणे होत.

मुकुंदराव नखाते यांच्यावर बुधवारी सायंकाळी वाईवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच भजन-भारुडी क्षेत्रातील अनेकांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments