Homeआरोग्यसलग सहाव्या वर्षी ICMR शिष्यवृत्तीवर नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मोहोर

सलग सहाव्या वर्षी ICMR शिष्यवृत्तीवर नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मोहोर

दोन MBBS विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शिष्यवृत्तीसाठी निवड; शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे संशोधन संस्कृतीला बळ

नांदेड| वैद्यकीय शिक्षणासोबतच संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेडने आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) प्रतिष्ठित ICMR-STS संशोधन शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष MBBS विद्यार्थी सद्भाव दीपक भुरे आणि कु. तरुशी सिवाच यांची निवड झाली आहे.

विशेष म्हणजे, महाविद्यालयाने सलग सहाव्या वर्षी ICMR-STS शिष्यवृत्ती मिळविण्याची परंपरा कायम राखली आहे. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधून मोठ्या संख्येने संशोधन प्रस्ताव सादर होत असताना या शिष्यवृत्तीसाठी निवड होणे ही विद्यार्थ्यांच्या संशोधन कौशल्याची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि बौद्धिक क्षमतेची राष्ट्रीय स्तरावरील दखल मानली जाते. मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग सहा वर्षे हे यश मिळवणे ही नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

संशोधनाला संस्थात्मक प्रोत्साहन – महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक विचारसरणी आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणाला सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. नियमित अभ्यासासोबत संशोधन, वैज्ञानिक सादरीकरणे आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी महाविद्यालयात संशोधनाभिमुख वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या कार्यात उपअधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले आणि डॉ. शितल राठोड यांचे विद्यार्थ्यांना संशोधनाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे.

संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन – जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख तथा मेडिकल रिसर्च सेलचे नोडल अधिकारी डॉ. आय. एफ. इनामदार यांनी विद्यार्थ्यांना संशोधन विषयाची निवड, अभ्यासाची रचना, माहिती संकलन, सांख्यिकीय विश्लेषण तसेच संशोधनातील नैतिक बाबी यांसह संपूर्ण संशोधन प्रक्रियेत मार्गदर्शन केले. तसेच विभागातील डॉ. आर. डी. गाडेकर, डॉ. कोमल वारकड, सानिया ऐमन आणि साईनाथ मैदपवाड यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

महाविद्यालयातील विविध विभागांतील प्राध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांनी नियमित अध्यापन, प्रात्यक्षिके आणि क्लिनिकल जबाबदाऱ्या सांभाळतानाच विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रस्तावांसाठी अतिरिक्त वेळ दिला. संशोधन प्रस्तावातील त्रुटी दूर करणे, त्याची गुणवत्ता वाढविणे आणि विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देणे या प्रयत्नांमुळे यशाची ही मालिका कायम राहिली आहे.

शिक्षकांच्या अथक परिश्रमांचा मोठा वाटा – ICMR शिष्यवृत्तीच्या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची असली, तरी त्या मेहनतीला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांचे योगदानही तितकेच मोलाचे आहे. डॉ. वैशाली इनामदार, डॉ. वंदना दुधामल, डॉ. मुकुंद कुलकर्णी, डॉ. हुमेरा खान, डॉ. संजयकुमार मोरे, डॉ. एम. ए. समीर, डॉ. चंडालिया, डॉ. उबेद खान, डॉ. अंजली देशमुख, डॉ. कपिल मोरे, डॉ. फारुखी, डॉ. किशोर राठोड, डॉ. सलीम तांबे, डॉ. अरविंद चव्हाण, डॉ. गजानन सुरेवाड, डॉ. कापसे, डॉ. झांगडे, डॉ. प्रदीप बोडके, डॉ. उमेश अत्राम, डॉ. मनोज हरनाळीकर, डॉ. राजेश अंबुलगेकर, डॉ. देगावकर, डॉ. केळकर, डॉ. अतिश गुजराथी, डॉ. अतुल राउत, डॉ. अमित पंचमहालकर, डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. सचिन तोटावार, डॉ. अजय वराडे, डॉ. जे. बी. देशमुख आणि डॉ. पंकज कदम यांच्यासह विविध विभागांतील शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

अध्यापन, प्रात्यक्षिके, क्लिनिकल पोस्टिंग, परीक्षा आणि अन्य शैक्षणिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांसाठी अतिरिक्त वेळ देणे हे शिक्षकांसाठी आव्हानात्मक असते. मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही जबाबदारी स्वीकारत शिक्षकांनी संशोधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

संशोधनातून विद्यार्थ्यांना व्यापक संधी – ICMR-STS शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक विकसित होतो. भविष्यातील पदव्युत्तर शिक्षण, अध्यापन, संशोधन आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील वाटचालीसाठी ही कौशल्ये उपयुक्त ठरणार आहेत. महाविद्यालयाची सलग सहा वर्षांची ही यशोगाथा केवळ शिष्यवृत्तीपुरती मर्यादित नसून गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण, समर्पित शिक्षक आणि संशोधनाभिमुख विद्यार्थी घडविण्याच्या संस्थात्मक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments