Homeआरोग्यOrgan Donation : 'अंगदान जीवन संजीवनी अभियान २०२६'ला उत्स्फूर्त प्रतिसाद; नांदेडमध्ये विविध...

Organ Donation : ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; नांदेडमध्ये विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन

नांदेड | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथे बधिरीकरणशास्त्र विभागाच्या वतीने “अंगदान जीवन संजीवनी अभियान २०२६” अंतर्गत अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानाला विद्यार्थी, निवासी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अवयवदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण करून “अंगदान करा, जीवन वाचवा” हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कल्पकतेने सहभाग नोंदविला.

पोस्टर आणि रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे महत्त्व, त्यासंबंधीचे गैरसमज दूर करण्याची गरज आणि “एक अवयवदान – अनेक जीवनदान” हा संदेश प्रभावीपणे मांडला. तसेच पथनाट्यातून अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हा हृदयस्पर्शी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

angadan 2 Organ Donation : 'अंगदान जीवन संजीवनी अभियान २०२६'ला उत्स्फूर्त प्रतिसाद; नांदेडमध्ये विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन

यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचे सांगत, एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते, असे प्रतिपादन केले. प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन अवयवदानाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविण्याची जबाबदारी पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि उपस्थित नागरिकांना अवयवदानाची प्रतिज्ञा दिली. अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments