कंधार,सचिन मोरे| कंधारकडून दुचाकीवरून सासरवाडी पेठवडज येथे आपल्या पत्नीस भेटण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीस्वराचा कंधार तालुक्यातील फुलवळ येथील पुलानजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक ३० जुलै रोज गुरुवारी दुपारी ३:०० वाजताचे सुमारास घडली असल्यामुळे नगारवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


घटनेची थोडक्यात वृत्त असे लोहा तालुक्यातील नगारवाडी येथील रहिवासी सचिन रावसाहेब येटलवाड वय २७ वर्षे व्यवसाय ऊसतोड कामगार हे दिनांक ३० जुलै २०२६ रोज गुरुवारी आपल्या दुचाकी क्रमांक एम एच १४ ईव्ही १९१३ वरून पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडी पेठवडज कडे जात असताना फुलवळ येथील पुलाजवळ सदरच्या दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार सचिन रावसाहेब येटलवाड यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


सदरच्या अपघाताबाबत कंधार पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनी वरून माहिती दिली असता, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अरविंद घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी गारोळे, सुनील साखरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सदरचे प्रेत शेवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे नेण्यात आले. मयत सचिन येटलवाड यांचे पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे.घटनेचे वृत्त लिहीपर्यंत घटनेची पुढील प्रक्रिया कंधार पोलीस प्रशासन करत आहेत.




