Homeनांदेडroad lost in potholes! खड्ड्यांत हरवला खैरगाव–मंगरूळ–वारंग टाकळी रस्ता!

road lost in potholes! खड्ड्यांत हरवला खैरगाव–मंगरूळ–वारंग टाकळी रस्ता!

नागरिकांचा संताप; ‘एखाद्याचा जीव गेल्यावरच रस्ता दुरुस्त करणार का?’

हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील मौजे खैरगाव–मंगरूळ–वारंग टाकळी या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, रस्ता आहे की खड्ड्यांची मालिका, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दोन-तीन वेळा रस्त्याचे काम करूनही काही दिवसांतच रस्ता पुन्हा उखडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार आणि ठेकेदारांच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या मार्गावरून दररोज नागरिक, वाहनधारक, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात. मात्र, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि चिखलामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात 
दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गरोदर माता, वृद्ध व्यक्ती आणि शाळकरी मुलांना या जीवघेण्या रस्त्यावरून ये-जा करावी लागत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार निधी खर्च होतो; मात्र रस्ता काही दिवसांतच पुन्हा खड्ड्यात जातो. त्यामुळे कामाच्या दर्जाची चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
IMG 20260722 WA0040 road lost in potholes! खड्ड्यांत हरवला खैरगाव–मंगरूळ–वारंग टाकळी रस्ता!
आमदार-खासदारांसह बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष?
रस्त्याची दुरवस्था अनेक दिवसांपासून कायम असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप वारंग टाकळी, मंगरूळ, खैरगाव परिसरातील नागरिकांनी केला आहे.
IMG 20260722 WA0041 road lost in potholes! खड्ड्यांत हरवला खैरगाव–मंगरूळ–वारंग टाकळी रस्ता!
“या खड्डेमय रस्त्यावर एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. रस्त्याची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments