SIR Registration : एसआयआर नोंदणीसाठी नागरिकांनी तत्काळ पुढे यावे – नगराध्यक्ष शेख रफिक यांचे आवाहन

NNL Team
2 Min Read
Oplus_16908288

हिमायतनगरच्या कैम्पमध्ये आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक अर्ज

हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या एसआयआर नोंदणी प्रक्रियेला नागरिकांनी गांभीर्याने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन हिमायतनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांनी केले आहे.

हिमायतनगर शहरातील चौपाटी येथे दोन दिवसापासून सुरु असलेल्या कैपमध्ये आतापर्यंत जवळपास २ हजार ५०० नागरिकांचे फॉर्म भरून नोंदणी करण्यात आली असून, नोंदणीसाठी आणखी काही दिवस शिल्लक आहेत. ज्या नागरिकांची अद्याप एसआयआर नोंदणी झालेली नाही, त्यांनी संबंधित बीएलओ (BLO) किंवा शहरातील सुरू असलेल्या विशेष कॅम्पच्या ठिकाणी भेट देऊन आपला फॉर्म भरून नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“एसआयआर नोंदणी न केल्यास आगामी निवडणुकीत मतदान करता येणार नाही, त्यामुळे नागरिकांनी ही प्रक्रिया गांभीर्याने घेऊन मुदतीपूर्वी आपली नोंदणी करून घ्यावी,” असे नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बीएलओ किंवा कॅम्प ठिकाणी संपर्क साधून नोंदणी पूर्ण करून घ्यावी, नोंदणीच्या शेवटच्या दिवसापूर्वी परमेश्वर मंदिर परिसर आणि आमच्या निवास स्थानासमोर कैम्प घेण्यात येणार आहे येथेही नोंदणी केली जाईल असे आवाहन करण्यात आले आहे.

IMG 20260718 091825 scaled SIR Registration : एसआयआर नोंदणीसाठी नागरिकांनी तत्काळ पुढे यावे - नगराध्यक्ष शेख रफिक यांचे आवाहन
Oplus_16908288

एसआयआर नोंदणी अभियानाचा एसडीओ अविनाश कांबळे यांनी घेतला आढावा“एकही पात्र नागरिक नोंदणीपासून वंचित राहू नये – फॉर्म भरताना कोणत्याही चुका होणार नाहीत याची बीएलओंनी दक्षता घ्यावी,” असे आवाहन उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केले. हिमायतनगर येथे सुरू असलेल्या एसआयआर नोंदणी अभियानाच्या दुसऱ्या दिवशी एसडीओ अविनाश कांबळे यांनी कॅम्पला भेट देऊन नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यांनी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना नागरिकांचे फॉर्म अचूकपणे भरून घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर, नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब, नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने मतदार नागरिक उपस्थित होते.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!