Homeनांदेडसरसेनापती नेताजी पालकर स्मारकासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा

सरसेनापती नेताजी पालकर स्मारकासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा

नांदेड| छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरसेनापती नेताजी पालकर यांच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील ऐतिहासिक समाधी स्थळाचा विकास करून भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा परिसरात राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली.

तामसा येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी छावा मराठा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अतुल सावे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी तामसा परिसराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत स्मारक उभारणीसाठी शासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

यावेळी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक सल्लागार समिती, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन व आढावा समिती स्थापन करणे, स्मारकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे तसेच प्रकल्प व्यवस्थापन समिती (पीएमसी) गठीत करण्याबाबत मागणी केली.

शिष्टमंडळाच्या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री श्री. सावे यांनी स्मारक उभारणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून स्मारकाच्या उभारणीस गती देण्यात येईल तसेच यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, आमदार राजेश पवार, आमदार भीमराव केराम तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीस किशोर चव्हाण, डॉ. राजेंद्र दाते पाटील, इंजि. तानाजी हुस्सेकर, कामाजी पवार, सुनंदा जोगदंड, डॉ. प्रभाकर जाधव, दीपक पावडे, दीपक राजुरकर, कैलास शिंदे, बबन पाटील, संजय हंबर्डे, सुनील कदम, दशरथ कपाटे, शिवानंद पाटील, विश्वजीत जाधव यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments