Dr. Omkar Devsarkar : हिमायतनगरचा मान उंचावला! डॉ. ओंकार देवसरकर यांना ‘MBBS’ पदवी

NNL Team
1 Min Read
Oplus_16908288

सिंधुदुर्ग/हिमायतनगर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या (SSPM) वैद्यकीय महाविद्यालयाचा पहिला ऐतिहासिक पदवीदान सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात हिमायतनगर (जि. नांदेड) येथील रहिवासी डॉ. ओंकार ममता विकास पाटील देवसरकर यांना ‘MBBS’ पदवी बहाल करण्यात आली. या यशामुळे हिमायतनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या भव्य सोहळ्याला एमयूएचएस, नाशिकचे माजी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे, आमदार डॉ. निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

आमदारांकडून कौतुक
हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी डॉ. ओंकार यांच्या यशाचे मनापासून अभिनंदन केले. “ग्रामीण भागातील युवकाने वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले हे यश प्रेरणादायी असून, ते भविष्यात उत्कृष्ट रुग्णसेवा देतील,” असे त्यांनी गौरवोद्गार काढले.

परिवारात आनंदाचा उत्सव
या सोहळ्यास डॉ. ओंकार यांच्या भगिनी डॉ. भक्ती देवसरकर देखील उपस्थित होत्या. एकाच कुटुंबात दोन डॉक्टर झाल्याने देवसरकर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जिद्द, मेहनत आणि यशाची कहाणी
ग्रामीण पार्श्वभूमीतून कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारे डॉ. ओंकार देवसरकर हे अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या या यशामुळे हिमायतनगरच्या नावाला नवसंजीवनी मिळाली असून, भविष्यात ते आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!