HomeनांदेडDamini Squad : नांदेड पोलिसांची ‘दामिनी पथक’ मोहीम

Damini Squad : नांदेड पोलिसांची ‘दामिनी पथक’ मोहीम

नांदेड| महाराष्ट्र पोलीस अंतर्गत नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘दामिनी पथक’ विशेष मोहीम राबवत आहे.

IMG 20260327 WA0021 Damini Squad : नांदेड पोलिसांची ‘दामिनी पथक’ मोहीम

या मोहिमेअंतर्गत शहर व परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात येत आहे. यावेळी त्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करत छेडछाड किंवा कोणताही त्रास झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

IMG 20260327 WA0020 Damini Squad : नांदेड पोलिसांची ‘दामिनी पथक’ मोहीम

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी थांबून महिलांना व विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवरही दामिनी पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत एकूण २५१ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून, १९ प्रकरणांमध्ये मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत सुमारे ₹३५,५०० दंड वसूल करण्यात आला आहे.

IMG 20260327 WA0015 Damini Squad : नांदेड पोलिसांची ‘दामिनी पथक’ मोहीम

या मोहिमेअंतर्गत शहरातील ५० हून अधिक शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यात येणार असून, अशी कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

IMG 20260327 WA0016 Damini Squad : नांदेड पोलिसांची ‘दामिनी पथक’ मोहीम

नागरिक, विद्यार्थी व पालकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा छेडछाडीची घटना आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments