HomeनांदेडHanuman Janmotsav : हनुमान जन्मोत्सवानिमित्त बोऱगडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन

Hanuman Janmotsav : हनुमान जन्मोत्सवानिमित्त बोऱगडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन

हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे बोऱगडी (देवाची) येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सोहळा श्री मारुती मंदिर ट्रस्ट कमिटी बोऱगडी, श्री चैतन्य भागवत सांप्रदाय प्रचार-प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. हनुमान जन्मोत्सव निमित्ताने संपूर्ण गावात सध्या भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा मंगलमय नाद घुमत आहे.

हभप.माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाची भव्य सुरुवात चैत्र शुद्ध नवमी दिनांक २६ मार्च २०२६ श्रीरामनवमी पासून होणार आहे. सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती, अभिषेक, पूजन, ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ हभप. ज्ञानेश्वर माउली सांभाळणार आहेत. दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व गाथा व्यासपीठ हभप.साहेबराव महाजन सांभाळणार आहेत. रात्रीला कीर्तन-भजनातुन हरिनामाचा गजर करत कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी, महिला, तरुण वर्ग आणि बालकांचा मोठा सहभाग यामध्ये राहणार असून, दिनांक ०२ एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी हनुमंत रायाचा जन्मोत्सव सोहळा अभिषेक, पूजन पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या होणार आहे.

या प्रमुख अभिषेक पूजे प्रसंगी हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी खासदार सुभाष वानखडे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हनुमान जन्मोत्सव च्या सायंकाळी ४.३० वाजता हभप. गणेश महाराज कोल्हारीकर यांचे कीर्तन होणार आहे.

संपूर्ण सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम चालणार असून, भक्तिमय वातावरण हरी नामस्मरणाच्या गजरात उत्सव साजरा केला जाणार आहे. उत्सवाच्या तयारीसाठी बोरगाडी गावात आध्यात्मिक उर्जा संचारली असून, जवळपासू संपूर्ण तयारी झाली आहे. या सप्ताहात विविध भागांतील नामांकित कीर्तनकार व प्रवचनकार आपली सेवा देणार आहेत. यामध्ये दिनांक २६ गुरुवारी हभप. पांडुरंग महाराज येहळेकर. दिनांक २७ शुक्रवारी साहेबराव पाटील मरडगेकर, दिनांक २८ शनिवारी हभप.निळोबा महाराज हरबळकर, दिनांक २९ रविवारी हभप.चिन्मय महाराज सातारकर,

दिनांक ३० सोमवारी भगवतीताई महाराज सातारकर, दिनांक ३१ मंगळवारी हभप.सुनील महाराज लांजुळकर, दिनांक ०१ बुधवारी हभप. गणेश महाराज राठोड, दिनांक ०३ गुरुवारी नारायण महाराज आर्वीकर यांच्या कीर्तन व प्रवचनातून भक्तांना धर्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला जात आहे. तर सप्ताहाचे शेवटच्या दिवशी दिनांक ०३ शुक्रवारी नारायण महाराज आर्वीकर यांचे सकाळी ०९ वाजता काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर भव्य महाप्रसादाने सांगता सोहळा अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात पार पडणार आहे.

या धार्मिक सोहळ्यासाठी संपूर्ण बोऱगडी गाव एकत्र आले असून ग्रामस्थांनी स्वखर्चाने आणि श्रमदानातून व देणगीदात्यांच्या सहकार्यातून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिला मंडळ, युवक मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय राहणार आहे. या पवित्र सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी घ्यावा, नामस्मरणात सहभागी व्हावे आणि अध्यात्मिक उन्नती साधावी, असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष संजय भैरवाड, सचिव लक्ष्मण भैरवाड व समस्त सदस्य मंडळी व गावकरी आयोजकांकडून करण्यात आले आहे. एकूणच, हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामुळे बोऱगडी गावात सध्या भक्तीचा उत्सव साजरा होणार असून “जय हनुमान” चा जयघोषात वातावरण दुमदुमनार आहे.

०३ एप्रिल रोजी भव्य कुस्त्यांची दंगल
दिनांक ०३ एप्रिल रोजी दुपारी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेत विविध ठिकाणामून मोठ्या प्रमाणात मल्लांची उपस्थिती राहणार आहे. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेतील विजयी मल्लांचा माधव काईतवाड, चक्रधर काईतवाड व निकेश राठोड यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments