Hanuman Janmotsav : हनुमान जन्मोत्सवानिमित्त बोऱगडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे बोऱगडी (देवाची) येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सोहळा श्री मारुती मंदिर ट्रस्ट कमिटी बोऱगडी, श्री चैतन्य भागवत सांप्रदाय प्रचार-प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. हनुमान जन्मोत्सव निमित्ताने संपूर्ण गावात सध्या भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा मंगलमय नाद घुमत आहे.
हभप.माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाची भव्य सुरुवात चैत्र शुद्ध नवमी दिनांक २६ मार्च २०२६ श्रीरामनवमी पासून होणार आहे. सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती, अभिषेक, पूजन, ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ हभप. ज्ञानेश्वर माउली सांभाळणार आहेत. दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व गाथा व्यासपीठ हभप.साहेबराव महाजन सांभाळणार आहेत. रात्रीला कीर्तन-भजनातुन हरिनामाचा गजर करत कार्यक्रमाचा शुभारंभ होणार ...
