Black market : नांदेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघड; श्रीनगर भागातून १० सिलिंडर जप्त

नांदेड| घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा पुरवठा विभागाने श्रीनगर परिसरात धाड टाकून १० रिकामे गॅस सिलिंडर जप्त केले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमान मंदिर रोड, श्रीनगर भागात राहणारे मकसूद अहमद हे आपल्या राहत्या घरी घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अवैध साठा करून चढ्या दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या तक्रारीची दखल घेत राहुल कर्डिले (जिल्हाधिकारी, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. जगदीश बारदेवाड (जिल्हा पुरवठा अधिकारी) व संजय वारकड (तहसीलदार) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १२ मार्च २०२६ रोजी संबंधित ठिकाणी आकस्मिक तपासणी केली.

तपासणीदरम्यान पथकाला एकूण १० रिकामे गॅस सिलिंडर आढळून आले. त्यामध्ये घरगुती वापराचे ७ सिलिंडर (एचपी – ३, भारत गॅस – २, इंडेन – २) तर व्यावसायिक वापराचे ३ सिलिंडर (एचपी कंपनीचे) असे एकूण १० सिलिंडर पंचासमक्ष जप्त करण्यात आले.

या प्रकरणात जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 च्या कलम ३ व ७ तसेच Liquefied Petroleum Gas (Restriction on Use and Fixation of Selling Price) Order, 2000 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने निरीक्षण अधिकारी रवींद्र राठोड यांनी भाग्यनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संबंधित आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईत निरीक्षण अधिकारी रवींद्र राठोड, मुंजाभाऊ लोकरे, बालाप्रसाद वल्लाकट्टी, वेदनेश्वर घावट (जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय) तसेच नवदीप जाधव आणि विश्वनाथ शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर किंवा अवैध साठवणूक करून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button