HomeनांदेडFilm Artists Visit : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सिने कलाकारांची नांदेड...

Film Artists Visit : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सिने कलाकारांची नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना भेट

नांदेड, प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रसार तळागाळापर्यंत व्हावा तसेच ग्रामीण भागात विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात सिने कलाकारांनी विविध ग्रामपंचायतींना भेट देत विकासकामांची पाहणी केली.

याअंतर्गत अभिनेते संदीप पाठक (Sandeep Pathak) व अभिनेत्री रसिकारसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) यांनी १३ मार्च रोजी नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत नेरली तर्फे बोंढार, देगलूर तालुक्यातील येरगी तसेच अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला.

भेटीदरम्यान त्यांनी गावांमध्ये राबविण्यात आलेल्या पायाभूत सुविधा, वृक्षारोपण, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता उपक्रम, घरकुल योजना तसेच ग्रामपंचायतींचे विविध अभिनव उपक्रम यांची माहिती घेतली.

ग्रामपंचायत नेरली तर्फे बोंढार येथे नूतन वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ग्रामपंचायत येरगी येथे नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन करून जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यात आली. यावेळी कलाकारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ग्रामस्थांनाही मार्गदर्शन केले.

JPJ 53 Film Artists Visit : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सिने कलाकारांची नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना भेट

तसेच अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे शुद्ध पाणीपुरवठा योजना, लोकसहभागातून उभारलेले मंगल कार्यालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान, मुलांसाठी खेळाचे मैदान, डिजिटल अंगणवाडी व शाळा तसेच शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेची पाहणी करून कलाकारांनी समाधान व्यक्त केले.

JPJ 5 Film Artists Visit : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सिने कलाकारांची नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना भेट

या भेटीदरम्यान पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments