कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

IMG 20260311 WA0033 कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

नांदेड l जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा २०२५-२६ मध्ये येथील कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या मैदानावर झाल्या. या स्पर्धेत कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळा नांदेडचा विद्यार्थी बाबू बालाजी डुकरे याने गोळा फेक क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला तर शिवाजी नागोराव गाडे हा व्दितीय आणि अमोल रावसाहेब वाघमारे हा तृतीय आला आहे. तसेच १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत याच कार्यशाळेचा विद्यार्थी गट अ मधून महेश विलास जाधव हा दुसरा आणि गट ब मधून परमेश्वर साहेबराव शिलगिरे याने व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

त्याचबरोबर २० जानेवारी रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या जिल्हा स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेच्या चमूने प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचा मान मिळवला.

संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उत्तम कुंटूरकर, मुख्याध्यापक एस. एम. खंडागळे यांनी कौतुक केले. शाळेचे कर्मचारी शुभम बिजमवार, वाडेकर, आरती भुरेवार, इरफान अली युनूस अली, अजय कांबळे, तिरुपती गोंदगे, गजानन पेंडलवार, संगीता वाघमारे व आर. सी. गांजरे यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top