Homeनांदेडअ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

नांदेड l अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हा शाखेची नवीन जिल्हा कार्यकारिणी एका बैठकीमध्ये आज घोषित करण्यात आली. देवगिरी प्रांताचे प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत जिल्ह्यातील ग्राहक हक्क संरक्षणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या बैठकीत ग्राहक पंचायतच्या कार्याचा आढावा घेत आगामी काळात ग्राहक जनजागृती, मार्गदर्शन आणि कायदेशीर सहाय्य या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनेने सक्रिय भूमिका बजावावी, असे मत व्यक्त करण्यात आले. ग्राहकांचे हक्क अबाधित राहावेत, बाजारपेठेतील गैरप्रकारांना आळा बसावा आणि सर्वसामान्य ग्राहकांना योग्य न्याय मिळावा यासाठी संघटनेची भूमिका अधिक बळकट करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग नऊच्या नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल नगरसेविका सदिच्छा सोनी- पाटील यांचा डॉ विलास मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बैठकीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हा शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार रमेश मस्के यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सदिच्छा सोनी पाटील आणि निलेश गादगे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संतोष कुलकर्णी यांची जिल्हा सचिवपदी, तर अनुजाताई डोईफोडे यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी शुभांगीताई पावडे यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच या कार्यकारणीमध्ये मुक्तेश्वरी देशमुख (महिला प्रमुख), प्रवीण कुलकर्णी (प्रचार व प्रसिद्धी प्रमुख), नीलिमा मिसाळ (पर्यावरण प्रमुख), धनश्री प्रवीण कुलकर्णी (जिल्हा रोजगार सृजन प्रमुख), ॲड. स्वाती कुलकर्णी (जिल्हा लीगल सेल प्रमुख), ॲड. विजय रानवळकर (जिल्हा लीगल सेल सहप्रमुख), प्रा. डॉ. भाग्यश्री कापरे (जिल्हा आयटी सेल प्रमुख) आणि रश्मीताई वडवळकर (ग्राहक मार्गदर्शन प्रमुख) यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. राम जाधव, उत्तम कुंटूरकर, विवेक पवार, जयंत वाकोडकर, गंगाधर मैलारे, आकाश काळे यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात ग्राहक हक्कांविषयी जनजागृती वाढविणे, ग्राहकांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि अन्यायकारक व्यापारी पद्धतींविरोधात संघटितपणे लढा उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी सेलू येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सचिव गंगाधर कान्हेकर यांचीही उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments