Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

1001701247 Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

लोहा/नांदेड | आधुनिक काळात लग्नसमारंभात महागड्या फोर व्हीलर आणि भव्य डेकोरेशनचा ट्रेंड वाढत असताना माळाकोळी येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री करण्यात आली. या अनोख्या आणि पारंपरिक स्वागतामुळे उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.

माळाकोळी येथील शेतकरी व पशुपालक कुटुंबातील रावसाहेब घुगे यांचे चिरंजीव पवन घुगे व उद्धव केंद्रे यांची कन्या ज्ञानेश्वरी केंद्रे यांचा विवाह ७ मार्च रोजी पार पडला. या विवाह सोहळ्यात पारंपरिक संस्कृतीला उजाळा देत वर-वधूची वरात सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून काढण्यात आली.

आकर्षक सजावट केलेली बैलगाडी, झुली पांघरलेली आणि शिंगे रंगवलेली खिल्लार बैलजोडी, घुंगरमाळा आणि फुलांनी सजवलेला मकर अशा पारंपरिक थाटात नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री करण्यात आली. बैलगाडीमध्ये मऊ गालिचे अंथरलेले असल्याने संपूर्ण दृश्य अधिकच आकर्षक दिसत होते.

1001695937 Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

या अनोख्या परंपरेमुळे उपस्थित पाहुणे, मित्रपरिवार आणि वऱ्हाडी मंडळींना जुन्या काळातील संस्कृतीची आठवण झाली. तर दुसरीकडे तरुणाईने या अनोख्या क्षणांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि रील्स शूट करत सोशल मीडियावर शेअर केले.

शेतकरी कुटुंबाने आपल्या पशुधनाला मान देत, “जुने ते सोने” हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. ज्या पशुधनावर शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून असते, त्या खिल्लाऱ्या बैलजोडीला विवाह सोहळ्यात विशेष स्थान देत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top