Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
लोहा/नांदेड | आधुनिक काळात लग्नसमारंभात महागड्या फोर व्हीलर आणि भव्य डेकोरेशनचा ट्रेंड वाढत असताना माळाकोळी येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री करण्यात आली. या अनोख्या आणि पारंपरिक स्वागतामुळे उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.
माळाकोळी येथील शेतकरी व पशुपालक कुटुंबातील रावसाहेब घुगे यांचे चिरंजीव पवन घुगे व उद्धव केंद्रे यांची कन्या ज्ञानेश्वरी केंद्रे यांचा विवाह ७ मार्च रोजी पार पडला. या विवाह सोहळ्यात पारंपरिक संस्कृतीला उजाळा देत वर-वधूची वरात सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून काढण्यात आली.
आकर्षक सजावट केलेली बैलगाडी, झुली पांघरलेली आणि शिंगे रंगवलेली खिल्लार बैलजोडी, घुंगरमाळा आणि फुलांनी सजवलेला मकर अशा पारंपरिक थाटात नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री करण्यात आली. बैलगाडीमध्ये ...
