Kandhar News : सेल्फी घेण्यासाठी गेला अन जीव गमावून बसला

NNL Team
2 Min Read

कंधार (सचिन मोरे) नांदेड येथून शासकीय काम पूर्ण करून रावणकोळा ता. मुखेड येथे परत जात असताना सेल्फी काढण्याच्या मोहात कनिष्ठ अभियंत्यावर जीव गमवण्याची दुर्दैवी घटना कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीचा पुलावर गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की देगलूर येथील कनिष्ठ अभियंता अविनाश किशन हांडे वय 34 मुळगाव रावणकोळा तालुका मुखेड हे उदगीर येथून त्यांचा मित्र चंद्रकांत दबडे हे दोघेजण मोटरसायकलने शासकीय काम करण्यासाठी नांदेड येथे 26 फेब्रुवारी गुरुवार रोजी गेले होते.

आपले काम आटोपून कंधार मार्गे रावणकोळा ता. मुखेड येथे परत जात असताना कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावर आले असताना फोटो काढण्याचा मोह मयत अविनाश हांडे यांना आवरता आला नाही फोटो काढण्याच्या नादात त्याचा तोल जाऊन पाय घसरून अविनाश हांडे हे नदीत पडले.

त्याच्या सोबतच्या साथीदार चंद्रकांत दबडे यांनी आरडाओरड करून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु मदतीला कुणी धावून आले नाही त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. घटनेनंतर काही वेळाने गावकऱ्यांनी अविनाश ला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही ते अविनाशला वाचू शकले नाही.

या दुर्देवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कंधार पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी अ. क्र.12/2026 कलम 194 बी.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार चोपवाड तपास करीत आहेत.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!