Ashwini Deshmukh MBBS Degree : प्रतिकूल परिस्थितीवर मात; वाळकेवाडीच्या कु. अश्विनी देशमुखे यांची एमबीबीएस पदवी संपादन

NNL Team
1 Min Read

नांदेड, अनिल मादसवार | जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील मौजे वाळकेवाडी गावासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. सीआरपीएफचे शूर जवान स्व. दत्ता रामजी देशमुखे यांची कन्या कु. अश्विनी दत्ता देशमुखे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेची एमबीबीएस पदवी संपादन केली आहे.

बालवयातच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जात तिने शिक्षणाची वाट खंडित होऊ दिली नाही. कठीण परिस्थितीला सामोरे जात तिने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तिच्या अथक परिश्रमांचे फळ म्हणून तिने Dr. Ulhas Patil Medical College & Hospital येथून एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली.

अत्यंत साध्या कुटुंबातून येत डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या अश्विनीने वाळकेवाडी गावाचे तसेच देशमुखे परिवाराचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कु. अश्विनी दत्ता देशमुखे हिचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून तिच्या पुढील वैद्यकीय सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!