HomeनांदेडBullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या...

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

हिमायतनगर, अनिल मादसवार| श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेली पारंपरिक पशुप्रदर्शन स्पर्धा यंदा मोठ्या उत्साहात पार पडली. देशी बैलजोडी गटातून भीमराव लालबा अडबलवाड यांच्या ‘ढवळ्या’ बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला, यावेळी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव जनावरांना आकर्षक सजावटीसह प्रदर्शनात उभे केले होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने सर्व जनावरांची सखोल तपासणी करून उत्कृष्ट पशूंची निवड केली.

देशी बैलजोडी गट – भीमराव लालबा अडबलवाड यांच्या ‘ढवळ्या’ बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. मारोतराव रामराव सूर्यवंशी यांच्या बैलजोडीने द्वितीय, तर तेजस आनंदराव मिराशे यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक मिळविला या विजेत्या शेतकऱ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

IMG20260226131408 01 Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव
oplus_0

देशी वळू गट – हणमंता राजाराम यांच्या वळूला प्रथम क्रमांक, साईनाथ लक्ष्मण शिंदे यांच्या वळूला द्वितीय, तर श्रीकांत शिंदे यांच्या वळूला तृतीय क्रमांक मिळाला या पशुच्या मालकांना प्रमाणपत्र ट्रॉफी व बक्षीस मान्यवारांच्या हस्ते देण्यात आले.

IMG20260226144216 01 Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव
oplus_0

देशी कालवड गट – प्रेमसिंग नेता जाधव यांच्या कालवडीने प्रथम क्रमांक मिळविला. राजकुमार किसनराव ठाकरे यांच्या कालवडीला द्वितीय, तर लक्ष्मण मारोती डांगे यांच्या कालवडीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

देशी गाय गट – बालाजी मारोती हंगरगे यांच्या गाईने प्रथम क्रमांक मिळविला. साईनाथ हनुमंत जंगीलवाड यांच्या गाईने द्वितीय, तर बालाजी गंगाराम वानखेडे यांच्या गाईने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

IMG20260226144443 01 Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव
oplus_0

या स्पर्धेतून ग्रामीण भागातील शेतकरी आजही आपल्या जनावरांची उत्कृष्ट पद्धतीने देखभाल करतात, याचे प्रत्यंतर पाहायला मिळाले. आगामी काळात स्पर्धेतील गटांची संख्या वाढवून बक्षिसांची रक्कम वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

विजेत्या शेतकऱ्यांना श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, यात्रा कमेटी अध्यक्ष सुभाष शिंदे, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, माजी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, दिलीप आला राठोड, दिगंबर वानखेडे, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन प्रवीण शिंदे, संतोष गाजेवार, नारायण माने, राम नरवाडे, पापा पार्डीकर आदिसह अनेक मान्यवर पशुवैद्यकीय अधिकारी व मंदिर संचालक यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व पशुपालकांचे अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या तर पशु प्रदर्शण परीक्षणाचे कार्य किनवट, माहूर, भोकर, हिमायतनगर येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, पशुपालक व भाविक उपस्थित होते. स्पर्धेमुळे यात्रेच्या उत्साहात आणखी भर पडली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments