नांदेडधार्मिक

Shri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी

हिमायतनगर/हदगाव/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने मार्च महिन्यात आयोजित भव्य दिव्य श्री रामकथा, श्री १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याच्या पूर्वतयारी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बैठकीस राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण Ashok Chavan व आमदार बाबुराव कदम कोहळीकर Baburao Kadam Kohalikar यांनी उपस्थित राहून भक्तगणांशी संवाद साधला. सादर बैठकीस बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यंदा होणाऱ्या भव्यदिव्य श्रीराम कथा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

641365223 1463179518504477 6662990953185585272 n Shri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली Meghna Kavli, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील Archana Patil यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन गोवत्स बालयोगी व्यंकट स्वामी महाराज Balayogi Venkatswami Maharaj यांचे आशीर्वाद घेतले.

641372384 1463180078504421 2722146325930518439 n Shri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी

या बैठकीस हदगाव, हिमायतनगर, भोकर व तामसा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी धार्मिक सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!